अयोध्या – अयोध्या विकास प्राधिकरणाने अयोध्या परिसरात बेकायदेशीरपणे सरकारी जमीन बळकावणाऱ्यांची तसेच बेकायदेशीर प्लॉटिंग करणाऱ्यांची एक यादी जाहीर केली असून त्यात अयोध्येचे महापौर आणि भाजपच्या एका माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. यातील अनेक नावे भाजपशी संबंधीत असल्याने त्यावरून जोरदार वादंग माजले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला….
या यादीत अयोध्येचे महापौर श्रृषिकेष उपाध्याय, आमदार वेदप्रकाश गुप्ता, माजी आमदार गोरखनाथ बाबा यांची नावे आहेत. अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याचे काम सुरू झाल्यानंतर या भागातील जमीनींना सोन्याचे भाव आले. त्यातून बेकायदेशीर प्लॉटिंग, बेकायदा कॉलनी उभारणे आणि जमीन बळकावण्याचा सिलसिला सुरू झाला.
या प्रकरणात बड्या राजकीय व्यक्तींनी आपले हात धुऊन घेतले. या भागातील खासदार लल्लू सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यात गुंतलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचीही मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर अयोध्या विकास प्राधिकरणाने अशी बेकायदा जमीन बळकावणे व प्लॉटिंग करणाऱ्यांची यादीच जाहीर केली आहे.
अजित पवारांच्या घरी बसा टीकेला देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीहून प्रत्युत्तर; म्हणाले…