यंदाच्या 72 व्या कान्स चित्रपट महोत्सवात बॉलिवूडच्या अभिनेत्री म्हणजेच दीपिका पदुकोण, टीव्ही अभिनेत्री हिना खान, डायना पेंटी आणि प्रियांका चोप्रा चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या. अभिनेत्री हुमा कुरेशी हिने कान्स महोत्सवाला हजेरी लावली होती. ‘फ्रेंच रिव्हिराच्या वोदका ब्रॅड ग्रे गूज’कडून यावर्षी हुमाने कान्सला हजेरी लावली होती. यापूर्वीही तिने रेड कार्पेटवर एक यूनीक असे पॅंटसूट परिधान केलेले होते.
हुमा कुरेशीने आपल्या इंस्टाग्राम आकाउंट वर यावर्षीच्या कान्स महोत्सवातील एक फोटो शेअर केला असून, निक जोनस सुद्धा या फोटोत दिसून येत आहे. हुमाने फोटोखाली ‘देसी गर्ल पॉवर पार्टीसाठी प्रियंका चोप्रा आणि निक जोनस धन्यवाद असं कॅप्शन दिलं आहे. मात्र, या पोस्टवर हुमाने निक जोनसला जीजू (भाऊजी) असं म्हंटल आहे. त्यामुळे सध्या हुमाच्या या अशा पोस्टला नेटिझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे.
https://www.instagram.com/p/BxpJfgwj12i/?utm_source=ig_web_copy_link