हॅमिल्टन :– विल यंगने केलेल्या अफलातून अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शुक्रवारी झालेला तिसरा सामना जिंकत ही मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडनेच जिंकला होता, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्यासाठी श्रीलंकेला हा सामना जिंकणे गरजेचे होते. त्यांचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाथुम निसांकाचे अर्धशतक व कर्णधार शनाकासह चामिका करुणारत्नेने केलेल्या खेळीनंतरही त्यांचा डाव 157 धावांवर संपला. न्यूझीलंडकडून मॅट हेनरी, हेनरी शिपले व डॅरेल मिशेल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
A 100-run partnership between Will Young (86*) and Henry Nicholls (44*) seals a 2️⃣-0️⃣ series victory 🏆 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/slFFVTHaa9
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 31, 2023
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्थाही 4 बाद 59 अशी बिकट बनली होती. मात्र, विल यंगने नाबाद 86 धावांची खेळी केली. त्याला सुरेख साथ देत हेनरी निकोल्सने नाबाद 44 धावा केल्या व संघाला 33 व्या षटकात 4 गडी गमावून 159 धावा करत विजय मिळवून दिला. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने सर्वाधिक 2 गडी बाद केले. न्यूझीलंडचा हेनरी शिपले मालिकेचा तर विल यंग सामन्याचा मानकरी ठरला.
ICC ODI World Cup 2023 : “विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका – 41.3 षटकांत सर्वबाद 157 धावा. (पाथुम निसांका 57, दासुन शनाका 31, चामिका करुणारत्ने 24, मॅट हेनरी 3-14, हेनरी शिपले 3-32, डॅरेल मिशेल 3-32).
न्यूझीलंड – 32.5 षटकांत 4 बाद 159 धावा. (विल यंग नाबाद 86, हेनरी निकोल्स नाबाद 44, लाहिरू कुमारा 2-39).