हॅमिल्टन – कर्णधार केन विल्यमसनचे दमदार शतक व ब्रॅडली वॅटलिंग, रॉस टेलर आणि हेनरी विकोल्स यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविवारी आपल्या पहिल्या डावात 431 धावांचा डोंगर उभा केला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात दिवस अखेर 1 गडी गमावून 30 धावा केल्या असून ते अद्याप 430 धावांनी पिछाडीवर आहेत.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड पहिला डाव – 155 षटकांत सर्वबाद 431 धावा. (केन विल्यमसन 129, ब्रॅडली वॅटलिंग 73, रॉस टेलर 70, हेनरी विकोल्स 56, शाहिन आफ्रिदी 4-109, यासिर शहा 3-113). पाकिस्तान पहिला डाव – 20 षटकांत 1 बाद 30 धावा. (शान मसुद 10, अबीद अली खेळत आहे 19, महंमद अब्बास खेळत आहे 0, काएल जेमिसन 1-5).