#NZvIND : महेंद्रसिंग धोनी संघात परतणार

वेलिंग्टन : अखेरच्या सामन्यात खेळण्यास महेंद्रसिंग धोनी तंदुरुस्त असल्याचे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात धोनी मैदानावर खेळताना दिसण्याची शक्‍यता आहे. धोनी संघात परतल्यामुळे संघातून कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईंल हे आता सामन्याच्या वेळीच कळेल.

मात्र, क्रीडा तज्ज्ञांच्या मते दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात येऊ शकते. तर, पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या नऊ धावा करणाऱ्या शुभमन गिलला आणखी संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

तिसऱ्या सामन्यापूर्वी धोनीच्या पायाचे स्नायू दुखावले गेल्याने दोन सामन्यांसाठी त्याला आराम देण्यात आला होता. आता तो संघात परतला आहे. पाचव्या सामन्यापूर्वी धोनीने कसून सराव केला. विराट-धोनीच्या अनुपस्थितीत भारताला चौथ्या सामन्यात दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. भारताचा संघ फक्‍त 92 धावांवर गारद झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)