आॅकलंड : मार्टिन गप्टील, राॅस टेलर यांच्या शानदार फलंदाजीनंतर टिम साउदी आणि काइल जेमीसन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा २२ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
The final wicket goes! Neesham gets Jadeja caught at long off by De Grandhomme as he looks to hit out with one wicket left. Impressive innings from Jadeja can't get his team over the line. A 22 run victory to win the ODI series. Scorecard | https://t.co/6E9wqCe2kt #NZvIND pic.twitter.com/DuR5pR1mDf
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 8, 2020
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ४८.३ षटकांत २५१ धावसंख्येवर संपुष्टात आला. भारताचे फलंदाज पृथ्वी शाॅ २४(१९), मयंक अग्रवाल ३(५), विराट कोहली १५(२५), के एल राहुल ४(८), केदार जाधव ९(२७) आणि शार्दुल ठाकूर १८(१५) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यरने ५७ चेंडूत (७ चौकार व १ षटकार) ५२, रविंद्र जडेजाने ७३ चेंडूत (२ चौकार व १ षटकार) ५५ आणि नवदीप सैनीने ४९ चेंडूत (५ चौकार व २ षटकार) ४५ धावा करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडत विजय साकारला.
Bennett gets the set man Iyer! Caught by Latham for 52. India 129/6 in the 28th as Thakur joins Jadeja. LIVE scoring | https://t.co/6E9wqCe2kt #NZvIND pic.twitter.com/moIypF6pSP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 8, 2020
न्यूझीलंडकडून टीम साउदीने १० षटकात ४१ धावा देत २ आणि काइल जेमीसनने १० षटकात ४२ धावा देत २ गडी बाद केले. तर हेमिश बेनेट आणि काॅलिन डी ग्रैंडहोमने प्रत्येकी २ गडी बाद केले. जेम्स नीशमने ९.३ षटकात ५२ धावा देत १ गडी बाद केला.
Captain @imVkohli wins the toss and elects to bowl first in the 2nd ODI against New Zealand. pic.twitter.com/DYkaYSCyzy
— BCCI (@BCCI) February 8, 2020
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून फलंदाजीत मार्टिन गप्टिलने ७९ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारासह सर्वाधिक ७९ तर राॅस टेलरने ७४ चेंडूत ६ चौकार व २ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. तर, हेनरी निकोल्सने ४१(५९), टाॅम ब्लंडेलने २२(२५) आणि काइल जेमीसनने नाबाद २५(२४) धावांची खेळी केली.
Overs 1-10: 52/0
Overs 11-20: 108/1
Overs 21-30: 159/3
Overs 31-40: 195/7
Overs 41-50: 273/8Ross Taylor's 73* after Guptill's 79 has helped 🇳🇿 to a fighting total despite Indian bowling brilliance in the middle overs.#NZvIND pic.twitter.com/HJW3KSRkPd
— ICC (@ICC) February 8, 2020
भारतीय संघाकडून गोलंदाजीत फिरकीपटू युजवेंद्र चहलने १० षटकात ५८ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले तर शार्दुल ठाकूरने १० षटकांत ६० धावा देत २ गडी बाद केले. रविंद्र जडेजाने १० षटकात ३५ धावा देत १ गडी बाद केला. जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनीला एकही विकेट मिळाली नाही. बुमराहने १० षटकात ६४ तर सैनीने १० षटकात ४८ धावा दिल्या. शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ फलंदाज धावबाद केला.