वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव १६५ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात दुस-या दिवसअखेर ७१.१ षटकात ५ बाद २१६ धावा केल्या असून भारतावर ५१ धावांची आघाडी घेतली आहे.
That's stumps on Day 2.
New Zealand score 216/5 and lead by 51 runs. @ImIshant picks three wickets. #NZvIND.
Will be an interesting Day 3 tomorrow.
Scorecard 👉👉 https://t.co/tW3NpQIHJT pic.twitter.com/t5nUKhU9FH
— BCCI (@BCCI) February 22, 2020
भारताने कालच्या ५ बाद १२२ धावसंख्येवरून पुढे खेळताना आज संघाची धावसंख्या १३२ वर पोहचली असता रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन यांची विकेट गमावली. पंत १९ तर अश्विन शून्यावर बाद झाला.
त्यानंतर अंजिक्य रहाणे ४६ तर इशांत शर्मा ५ धावांवर माघारी परतला. मोहम्मद शम्मीने २१ धावा करत संघाची धावसंख्या १५० पार नेली. शमी बाद होताच भारताचा डाव १६५ वर संपुष्टात आला.
India all out for 165.
Four wickets apiece for Southee and Kyle Jamieson 👏 #NZvIND pic.twitter.com/Z6mzEa11Wd
— ICC (@ICC) February 21, 2020
न्यूझीलंकडून पहिल्या टिम साउदीने ४-४९, काइल जेमिसनने ४-३९ आणि ट्रेंट बोल्टने ५७-१ विकेट घेतली.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने टाॅम लाथम ११(३०), टाॅम ब्लंडेल ३०(८०), केन विल्यमसन ८९(१५३), राॅस टेलर ४४(७१) आणि हेनरी निकोल्सच्या १७(६२) धावांच्या खेळीच्या जोरावर दुस-या दिवसअखेर ५ बाद २१६ अशी मजल मारली आहे.
It's stumps in Wellington with deteriorating light forcing the end of the day's play.
Kane Williamson's 89 gave New Zealand the advantage, but Ishant's three strikes kept India in the contest.#NZvIND Scorecard 👉 https://t.co/UxqdaHZ14g pic.twitter.com/jgluXRf9NX
— ICC (@ICC) February 22, 2020
भारताकडून गोलंदाजीत इशांत शर्माने ३-३१ तर मोहम्मद शम्मीने १-६१ आणि रविचंद्रन अश्विनने १-६० विकेट घेतली आहे.
दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बी जे वाॅलिंग १४(२९) आणि काॅलिन डी ग्रैंडहोम ४(२) धावांवर खेळत होता.