#NZvIND : भारताला विजयासाठी २४४ धावांचे आव्हान 

माउंट मोंगानुई – रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या दमदार फलंदाजीनंतरही न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४९ षटकात २४३ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाला विजयासाठी आता २४४ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.

सुरुवातीला नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील आणि केन विलियम्सन झटपट माघारी परतले. यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. केवळ सात धावांनी रॉस टेलरचे शतक हुकले व तो तंबूत परतला. यानंतर न्यूझीलंडचा संघ कोलमडला. भारताकडून मोहम्मद शमीने ३ तर युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन बळी घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रतिस्पर्धी संघ –
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, विजय शंकर, शुभमन गिल, खलील अहमद, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टील, टॉम लॅथम, कॉलिन मुन्रो, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साउदी, रॉस टेलर, कॉलिन डीग्रॅंडहोम, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, मॅट हॅन्री.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)