हॅमिल्टन : इंग्लंडविरूध्दचा दूसरा कसोटी सामना न्यूझीलंडला अनिर्णत राखण्यात यश आलं आहे. यासह न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका १-० अशी जिंकली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात १०१ धावांची आघाडी घेतल्यानंतर चौथ्या दिवशी न्यूझीलंडची २ बाद ९६ अशी अवस्था केल्यानंतर इंग्लंड संघ आज विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला.
पण पाचव्या दिवशी कर्णधार केन विलियमसन आणि राॅस टेलरच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत मिळवलेल्या विजयाच्या जोरावर मालिका १-० अशी खिशात घातली. पहिल्या डावात व्दिशतक ठोकणारा इंग्लंडचा फलंदाज जो रूट सामनावीर ठरला.
Match drawn!
Centuries from Kane Williamson and Ross Taylor take New Zealand to 241/2 on day five before rain plays spoilsport, forcing early close of play.
The hosts win the series 1-0.#NZvENG SCORECARD 👇https://t.co/eBrKe7xmfM pic.twitter.com/jgfRx171bp
— ICC (@ICC) December 3, 2019
कालच्या २ बाद ९६ धावसंख्येवरून आज पाचव्या दिवशी पुढे खेळताना विलियमसन आणि टेलर यांनी सावध खेळ केला. न्यूझीलंडची २ बाद २८ अशी अवस्था झाल्यानंतर या जोडीने संयमी फलंदाजी करत २१३ धावांची भागिदारी करत विकेटची पडझड होऊ न देता सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळविले. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजांला ही जोडी फोडण्यात अपयश आले.
विलियमसने कसोटी कारकिर्दीतील २१ वे तर राॅस टेलरने १९ वे शतक झळकावले. राॅस टेलरने आजच्या सामन्यात कसोटीतील ७,००० धावांचा टप्पा सुध्दा पार केला. न्यूझीलंड क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा टेलर हा स्टीफेन फ्लेंमिगनंतरचा दूसरा खेळाडू ठरला.
Ross Taylor became only the second New Zealand batsman to complete 7,000 Test runs after Stephen Fleming. pic.twitter.com/Mrgo5QMG8l
— ICC (@ICC) December 3, 2019
आजच्या दिवशीही पावसामुळं सामना लवकर थांबविण्यात आला. पाचव्या दिवशी खेळ थांबला तेव्हा केन विलियमसन २३४ चेडूंत नाबाद १०४( ११ चौकार) आणि राॅस टेलर १८६ चेंडूत नाबाद १०५ (११ चौकार) धावांवर खेळत होते. दोघांच्या खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला. न्यूझीलंडने दुस-या डावात २ बाद २४१ पर्यत मजल मारत १४० धावांची आघाडी घेतली होती.
संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड : पहिला डाव : सर्वबाद ३७५( टाॅम लाथम १०५, डैरेल मिचेल ७३, स्टुअर्ट ब्राॅड ७३-४,क्रिस वोक्स ८३-३)
इंग्लंड : पहिला डाव : सर्वबाद ४७६( जो रूट २२६, राॅरी बर्न्स १०१, आॅली पोप ७५, नील वैगनर १२४-५, टीम साउदी ९०-२)
न्यूझीलंड : दूसरा डाव : २ बाद २४१( केन विलियमसन नाबाद १०४, राॅस टेलर नाबाद १०५, क्रिस वोक्स १२-१, सॅम करन ५६-१)