#NZvAUS : न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर विजय

ख्राईस्टचर्च – डेव्हन माल्कम झंझावाताने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळविण्यात यश आले. न्यूझीलंडने हा सामना 53 धावांनी जिंकला.

न्यूझीलंडने 5 बाद 184 धावांची मजल मारली. यात डेव्हन माल्कमच्या 59 चेंडूंतील नाबाद 99 धावांचा प्रमुख वाटा होता. ऑस्ट्रेलियाचा डाव 17.3 षटकांत 131 धावांतच आटोपला. न्यूझीलंडच्या ईश सोधीने 28 धावांत 4 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड 20 षटकांत 5 बाद 184 धावा. (डेव्हन माल्कम नाबाद 99, ग्लेन फिलिप्स 30, डॅनिएल सॅम्स 2-40). ऑस्ट्रेलिया – 17.3 षटकांत सर्वबाद 131 धावा. (मिशेल मार्श 45, ऍश्‍टन ऍगर 23, ईश सोधी 4-28, टिम साऊदी 2-10, ट्रेन्ट बोल्ट 2-22).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.