NZ vs SL T20 Series : लॉकी फर्ग्युसन आणि ग्लेन फिलिप्स यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा पाच धावांनी पराभव केला आणि यासह दोन सामन्याची टी-20 मालिका न्यूझीलंडने 1-1 ने बरोबरीत सोडविली आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाला श्रीलंकेनं 19.3 षटकात 108 धावांवरच रोखलं होते. पण प्रत्युत्तरात यजमानाचा डाव 19.5 षटकात अवघ्या 103 धावांतमध्येच आटोपला. विशेष म्हणजे फर्ग्युसनने या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची कमाल केली. या सामन्यात न्यूझीलंडचा यष्टिरक्षक मिचेल हेय याचेही योगदानही खास होते, ज्याने या सामन्यात 5 झेल आणि 1 स्टंपिंग केले.
या विजयासह न्यूझीलंडने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये बचाव केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. फर्ग्युसन पाच महिन्यांनंतर संघात परतत होता आणि परत येताच त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो न्यूझीलंड देशाचा सहावा गोलंदाज ठरला आहे. हॅटट्रिक घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान देणारा लॉकी फर्ग्युसन हा सामनावीर ठरला. त्यानं सामन्यात 2 षटकात 7 धावा देत 3 फलंदाज बाद केले. तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा हा मालिकावीर ठरला.
Series shared! Three wickets in the final over from Glenn Phillips helping steer the team to a thrilling victory in Dambulla. Catch up on all scores https://t.co/aBrsGIzU3j 📲 #SLvNZ #CricketNation 📸 = SLC pic.twitter.com/rcNg1y3xyt
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 10, 2024
अशी पूर्ण केली हॅट्ट्रिक…
लॉकी फर्ग्युसनने डावाच्या सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुसल परेराला (3) यष्टिरक्षक मिचेल हेकडे झेलबाद केले. या सामन्यातील त्याचे हे पहिलेच षटक होते. यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या षटकाच्या (डावाचे 8वे षटक) पहिल्या दोन चेंडूंवर कामिंदू मेंडिस (1), चरित असलंका (0) यांना बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली.
असा झाला सामना….
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली होती. यजमान संघाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत किवी संघाला मोठी धावसंख्या होऊ दिली नाही आणि 108 धावांवरच रोखलं. किवी संघाचे केवळ तीनच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले. विल यंगने सर्वाधिक 30 धावा केल्या तर जोस क्लार्कसनने 24 आणि कर्णधार सँटनरने 19 धावा केल्या. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक चार आणि पाथीरानाने तीन बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले तर नुवान तुषाराने 2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ येथे केवळ 103 धावा करू शकला. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निसांकाने 51 चेंडूत 6 चौकारासह सर्वाधिक 52 धावा केल्या. त्यानं शेवटपर्यंत संघर्ष केला व तो संघाला विजय मिळवू देऊ शकला नाही. निसांका व्यतिरिक्त टॉप ऑर्डरचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. त्याच्याशिवाय भानुका राजपक्षे (15) आणि महीष तीक्षणा (14) या दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला.
शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी फक्त 8 धावांची गरज होती. फिलिप्सने शेवटचे षटक टाकले आणि निसांका, पाथिराना आणि नुवान तुषारा यांना बाद करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने 2 षटकांत 7 धावांत 3 बळी, ग्लेन फिलिप्सने 1.5 षटकांत 6 धावांत 3 बळी, मायकेल ब्रेसवेलने 4 षटकांत 23 धावांत 2 आणि सँटनर-फॉल्क्सने प्रत्येकी 1-1 बळी घेतले.
टी-20 नंतर आता एकदिवसीय मालिका…
टी-20 मालिकेनंतर आता 13 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 17 नोव्हेंबरला आणि तिसरा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना डंबुला येथे खेळवला जाईल, तर दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना पल्लेकेले येथे होणार आहेत. सर्व सामन्याची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता अशी असेल.