ख्राइस्टचर्च : भारतीय संघाने न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेतील दुस-या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ६३ षटकांत सर्वबाद २४२ धावा केल्या. प्रत्यूत्तरात न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर २३ षटकात बिनबाद ६३ धावा केल्या असून ते अजूनही १७९ धावांनी पिछाडीवर आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टाॅम लाथम २७(६५) आणि टाॅम ब्लंडेल २९(७३) धावांवर खेळत होते.
The Toms take us to the close 63/0 and 179 behind at Hagley Oval. Scorecard | https://t.co/z3Er2dXVK3 #NZvIND pic.twitter.com/HJfBQa2yaN
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 29, 2020
तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना शाॅच्या ५४, पुजाराच्या ५४ आणि विहारीच्या ५५ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद २४२ अशी मजल मारली होती.
मंयक अग्रवाल (७), विराट कोहली(३), अजिंक्य रहाणे (७) आणि रिषभ पंत(१२) हे पुन्हा एकदा अपयशी ठरले. जडेजाने ९,शम्मीने १६ आणि बुमराहने नाबाद १० धावा केल्या.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काइल जेमिसनने ४५ धावांत सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर टिम साउदी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ गडी बाद केले. नील वॅगनर याने २९ धावा देत १ गडी बाद केला.