मुंबई – बॉलिवूडमनध्ये सध्या दिवाळी पार्टीची जोरदार चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलीवूड स्टार स्क्रिनवर कमी आणि पार्ट्यांमध्येचं जास्त वेळ घालवताहेत की काय असा प्रश्न आता नेटकऱ्यांनी उपस्थित करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या पार्ट्यांमध्ये अनेक स्टार किड्सही सामील झाल्याचे दिसून आले. या दिवाळी पार्टीचे काही आतले फोटो आता समोर आले आहेत. विशेष बाब म्हणजे या फोटोंमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अजय देवगणची लाडकी मुलगी न्यासा देवगण एकत्र पार्टी करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
या फोटोंमधील दोन्हही स्टार किडसचे बॉन्डिंग पाहून असे म्हणता येईल की दोघेही खूप चांगले मित्र आहेत.हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत ज्यामध्ये सर्वांच्या नजरा आर्यन आणि न्यासा यांच्यावर खिळल्या आहेत.चित्रपट निर्माते अमृतपाल बिंद्रा यांनी त्यांच्या घरी एक भव्य प्री-दिवाळी पार्टी दिली.यावेळेसचे काही खास फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये आर्यन खान, न्यासा देवगन आपल्या मित्रांसह दिसत आहेत.
फोटोंमध्ये, आर्यन खानने राखाडी टी-शर्टसह तपकिरी रंगाचा कोट घातलेला दिसत आहे, तर न्यासाने ग्रे आणि सिल्व्हर कॉम्बिनेशन लेहेंगा घातला आहे.अम्रिपाल बिंद्राच्या पार्टीला अनेक स्टार्स उपस्थित होते. ज्यामध्ये कियारा अडवाणी, शाहरुख खान, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, श्नेता नंदा आणि नव्या नंदा यांच्या नावाचा समावेश आहे. अजय देवगणची मुलगी न्यासा अनेकदा तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. तशी या पार्टीमध्ये देखील ती आपल्या लूकमुळे चर्चेत आली होती.