नवी दिल्ली – प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार “नुसरत जहॉं’ नेहमीच कोणत्या ना कारणामुळे चर्चेत असतात. दरम्यान, नुसरत यांनी आपल्या इंस्टाग्राम आकाऊंवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले असून, या फोटोंमुळे त्यांना ऑनलाइन जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.
काही दिवसांपूर्वी नुसरत यांनी देवी दुर्गेच्या रूपात एक फोटोशूट केलं होतं. याचे काही फोटो त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यानंतर नुसरत जहॉं धार्मिक द्वेषाची बळी ठरली आणि लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
अनेकांनी नुसरत यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. मुस्लिम कुटुंबात जन्मल्यानंतर नुसरत यांनी कोलकत्याचे व्यावसायिक निखिल जैन या हिंदूशी लग्न केल्यानंतर अनेकदा त्यांनाअशा पद्धतीच्या धमक्या मिळत राहिल्या आहेत.
दरम्यान, शेअर केल्या या फोटो मुळे नुसरत जहॉं यांना अनेकांनी हिंदू आडनाव ठेवण्याचा सल्ला दिला. मुस्लिम असून हिंदू देवीचं फोटोशूट केल्याबद्दल त्यांची टीका केली जाऊ लागली आहे.
View this post on Instagram
#happyindependenceday 🇮🇳 🥻@sandip3432 🎥 @bipradip_chakraborty 📸 @siladitya_dutta 💄 @sahababusona