मुंबई – नुसरत भरुचा सध्या “छोरी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमात नुसरत गर्भवतीचा रोल करते आहे. एका गावातील एका जुनाट घरामध्ये पतीसमवेत तिला आश्रय घ्यायला लागलेला असतो. या घरामध्ये तिला काही पॅरानॉर्मल अनुभव येतात.
अशी ही भीतिदायक कथा आहे. असेच अनुभव नुसरत भरुचाला दिल्लीतील एका हॉटेलमध्ये राहिली असताना आले होते, ते तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले. नुसरतने तिची सुटकेस उघडून टेबलावर उघडीच ठेवली होती.
मात्र, सकाळी उठल्यावर ही सुटकेस जमिनीवर होती आणि आतील कपडे बाहेर अस्ताव्यस्त पसरलेले होते. हे आपोआपच होऊ शकत नाही. त्या हॉटेलमध्ये काहीतरी होते. ते मला जाणवत होते, असे नुसरतने सांगितले.
“छोरी’ हा 2007 मधील मराठी “लपाछपी’चा हिंदी रिमेक आहे. “छोरी’ आणि “लपाछपी’ दोन्हींचे डायरेक्शन विशाल पुरीयाने केले आहे. नुसरतने या सिनेमासाठी प्रेग्नंट बॉडी स्कीन
वापरण्याचा सराव करण्यासाठी 25 दिवस बॉडी स्कीनसह वावरण्याचा सराव केला होता. घरातील भीतिदायक प्रसंगांच्यावेळी नुसरतला खरोखर भीतीने रडू कोसळले होते, हा अनुभव अगदी जिवंत होता.