नुसरतनं शेअर केले “छोरी’च्या शुटिंगचे फोटो; पूजा करून सुरू केली ‘शुटिंग’

मुंबई – नुसरत भरुचाने तिच्या “छोरी’ या आगामी सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या मुहुर्ताच्या सीनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील काही मुहुर्ताच्या पूजेचे फोटो आहेत. तर एक फोटो मुहुर्ताच्या सीनसाठी क्‍लॅपबोर्ड हातात घेतलेला तिचा स्वतःचा फोटो आहे.

तिने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये सिनेमाच्या सर्व टीमला ही पोस्ट समर्पित केली असल्याचे म्हटले आहे. “छोरी’ हा एक हॉरर सिनेमा असून मराठीतील गाजलेल्या “लपाछपी’चा हिंदी रिमेक असणार आहे. नुसरत भरुचाचा हा पहिलाच हॉरर सिनेमा असणार आहे. यापूर्वी तिने “ड्रीम गर्ल’, “प्यार का पंचनामा’ आणि अन्य काही हलके फुलके सिनेमे केले आहेत. तरी तिच्या वाट्याला आतापर्यंत हॉरर सिनेमा आलेला नव्हता.

“छोरी’मध्ये नुसरत भरुचा शिवाय मीता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल मुख्य भूमिकेत आहेत. एका दाम्पत्याला ऊसाच्या शेतातील एक घरामध्ये रहायला लागते. त्यानंतर घडणाऱ्या चित्रविचित्र घटनांची मालिका या हॉरर सिनेमात असेल.


ऊसाचे शेत दाखवण्यासाठी मध्यप्रदेशातील एका ऊसाच्या शेतातच “छोरी’चा सेट उभा केला गेला आहे. “छोरी’ शिवाय “जनहित में जारी’मध्येही नुसरत भरुचा दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.