क्रुरता! करोना रुग्णांच्या जीवाशी खेळ; रेमडेसिवीर म्हणून दिलं खाऱ्या पाण्याचं इंजेक्शन, एकाला अटक

बंगळुरु – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दररोज अडिच लाखाहून अधिक करोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. दुसऱ्या लाटेतील करोनाची लक्षणं पहिल्या पेक्षा अधिक तिव्र आहेत. त्यामुळे बाधितांना रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्यातच रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने इंजेक्शनच्या काळ्याबाजाराला उधाण आलं आहे. अशातच रेमडेसिवीर म्हणून रुग्णाला खाऱ्या पाण्यात अॅंटिबायोटिक्स मिसळून इंजेक्शन दिल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

कर्नाटकातील म्हैसूरमधील जेएसएस रुग्णालयातील स्टाफ नर्स गिरीश हा 2020 पासून करोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर म्हणून खाऱ्या पाण्यात अॅंटिबायोटिक्स मिसळून इंजेक्शन देत असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी गिरीशला अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये अजूनही अनेक जणांचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे.

म्हैसूरचे पोलिस आयुक्त चंद्रगुप्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूर पोलिसांना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तपास सुरु केला असता गिरीश रेमडेसिवीर म्हणून खाऱ्या पाण्यात अॅंटिबायोटिक्स मिसळून रुग्णाला इंजेक्शन देत असल्याचे उघड झाले. गिरीश हा विविध कंपन्यांच्या रेमडेसिवीर च्या बाटल्या घेऊन त्यात खारे पाणी आणि अॅंटिबायोटिक्स भरून त्याची विक्री करत होता. त्याचा हा काळाबाजार 2020 पासून सुरु असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी म्हैसूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.