बॉलिवूडमधील ऍक्शन हिरो अर्थात अक्षय कुमार याचा “मिशन मंगल’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अक्षय कुमार दिल्लीत आला असताना त्याने एक व्हिडिओ शूट केला होता.
हा व्हिडिओ सिंगर बी प्राक यांच्या नवीन गाण्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हे गाणे जानी यांनी लिहिले आहे. या गाण्याची थीम काहीशी सॅड आणि रोमांटिक असणार आहे. यापूर्वी बी प्राक याने अक्षय कुमारच्या होम प्रॉडक्शन “केसरी’ चित्रपटातील “तेरी मिट्टी’ हे गाणे गात बॉलिवूडमध्ये डेब्ये केले होते. हे गाणे खूपच हिट झाले होते.
बी प्राक यांचा हा व्हिडिओ लवकरच प्रदर्शित होणार असून यात अभिनेत्री कृति सैननची बहिण नुपूर सैननही झळणार आहे. तसेच नुपूर लवकरच बॉलिवूडमध्येही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय नुपूरची मोठी बहिण कृति ही अक्षयसोबत “हाउसफुल-4’मध्ये दिसणार असून हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. आता अक्षयसोबत नुपूर या गाण्यात कशी दिसते याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.