विषारी दारूने घेतलेल्या बळींची संख्या 70 वर

हरीद्वार : उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधील दोन जिल्ह्यांत विषारी दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तब्बल 70 वर पोहचली आहे. उत्तराखंडच्या हरीद्वार जिल्ह्यातील बालूपूरमध्ये गुरूवारी सायंकाळी तेरवीनंतर शेकडो लोक दारू प्यायले. त्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली.

तेरवीसाठी हरीद्वारलगत असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातूनही लोक आले होते. दारू पिणाऱ्यांपैकी 24 जण बालूपूर परिसरात मृत्युमुखी पडले. तर सहारनपूर जिल्ह्यातील 46 जणांचा बळी दारूने घेतल्याचे स्पष्ट झाले. विषारी दारू दुर्घटनेतील मोठ्या जीवितहानीमुळे लगतच्या दोन्ही जिल्ह्यांवर शोककळा पसरली आहे. त्या दुर्घटनेनंतर दोन्ही राज्यांतील काही प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली. मृतांच्या कुटूंबीयांना याआधीच प्रत्येकी 2 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)