पाटण – पाटण तालुक्यात शुक्रवारी रात्री उशिरा सहा जण करोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 55 वर पोहोचली आहे. तालुक्यातील 18 नमुने शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
यापूर्वीचे प्रलंबित 25 असे एकूण 43 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली. पाटण तालुक्यात शुक्रवारी रात्री उशिरा सहा व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात नवारस्ता 1, जांभेकरवाडी 2, आडदेव 1, नवसरवाडी 1, ताम्हिण 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.