नवी दिल्ली – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जातींचाच बोलबाला राहीला. त्यातही इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींची चर्चा सगळ्यांत जास्त झाली. नव्या लोकसभेत त्यामुळेच ओबीसींची संख्या वाढली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समुदायातील २२.८ टक्के खासदार संसदेवर निवडून आले होते. तर आताच्या निवडणुकीत ही टक्केवारी २५.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अन्य कोणत्याही समुदायाच्या अथवा जातीच्या खासदारांच्या संख्येत एवढी वाढ झालेली नाही.
जातीच्या आधारावरच सांगायचे झाले तर उच्चवर्णीयांतील सगळ्यांत जास्त २५.८ खासदार निवडून आले आहेत. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संख्येत ३ टक्क्यांची घट झाली आहे. मागच्या निवडणुकीत लोकसभेवर निवडून आलेल्या उच्चवर्णियांची संख्या २८.५ टक्के होती. आता लोकसभेत उच्चवर्णीय आणि ओबीसी खासदारांची संख्या जवळपास समान झाली आहे. २०१९ मध्ये त्यांच्या सहा टक्क्यांची तफावत होती.
कोणत्या जाती- समुदायाचे किती खासदार?
उच्च जाती- २५.८ टक्के
इंटरमिडियट कास्ट- १३.६ टक्के
ओबीसी- २५.४ टक्के
एससी- १५.८ टक्के
एसटी- १०.१ टक्के
मुस्लिम- ४.४ टक्के
ख्रिश्चन- १.३ टक्के
शीख- २.४ टक्के
बौध्द- ० टक्के