पुणेकरांना हादरा! करोनाची रुग्ण संख्या आणखी वाढली

पुणे –  शहरातील करोना रुग्णवाढीचा वेग कायम असून, मागील चोवीस तासात तब्बल 465 बाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबतच ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटरवरील गंभीर रुग्णांचीही संख्या वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

 

मागील चोवीस तासांत 4 हजार 424 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. त्यापैकी 465 बाधित आढळले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचार सुरू असलेल्या पुण्यातील 6 रुग्णांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

सुमारे महिनाभरानंतर ऍक्टीव्ह रुग्णांच्या संख्येने पुन्हा दोन हजारांचा टप्पा ओलांडला असून ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 2 हजार 156 झाली आहे. शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 1 लाख 96 हजार 389 पर्यंत पोहोचली आहे.

 

रुग्णवाढीचा दर असाच कायम राहिल्यास येत्या आठवड्याभरात दोन लाख रुग्णांचा टप्पा गाठला जाईल. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 89 हजार 421 झाली आहे. तर आतापर्यंत 4 हजार 812 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.