पैशांसाठी व्यावसायिकाची नग्नावस्थेत धिंड

पुणे: जग्वार कंपनीची चारचाकी दुरुस्त करण्यासाठी मध्यस्थीने सांगितल्यापेक्षा कमी पैसे घेतल्याने, आठ तरुणांनी वाहनांची दुरुस्ती करणा-या व्यावसायिकाची नग्नावस्थेत धिंड काढून त्यांना सिगारेटचे चटके दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

आरोपींनी संबंधित व्यवसायिकचे 16 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथील गॅरेजमधून अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना हडपसर आणि खराडी परिसरात नेले. तेथे व्यावसायिकाचे कपडे काढून त्यांना लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण केली. तसेच अंगावर थुंकले. त्यानंतर त्यांची नग्नावस्थेत धिंड काढून अंगावर सिगारेटचे चटके दिले. हा सर्व प्रकार केल्यानंतर आरोपींनी व्यावसायिकास पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा त्यांच्या गॅरेजजवळ सोडले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित तरुण व्यावसायिक हे मूळचे कर्नाटक येथील आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी कोंढवा येथे गाडी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. 16 नोव्हेंबर पूर्वी त्याच्याकडे जग्वार कंपनीची एक गाडी आरोपींच्या ओळखीने त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आली होती. त्यामुळे त्यांनी व्यावसायिकास दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घ्यायला सांगितले. मात्र पीडित व्यावसायिकाने अडीच लाख रुपये घेतले. याच रागातून आरोपींनी त्यांचे अपहरण केले.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी याबाबत तक्रार करण्यासाठी मी कोंढवा पोलिस ठाण्यात गेलो होते. मात्र अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने पोलिस गुन्हा दाखल करण्यासाठी सरसावले असल्याचा आरोप संबंधित पीडित व्यावसायिकाने केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here