पूनम पांडेचं न्यूड फोटो सेशन ट्‌वीटरवर व्हायरल

नेटकऱ्यांच्या पडल्या उड्या

मुंबई – आपली वादग्रस्त वक्तव्ये आणि उन्मादक अवस्थेतील छायाचित्रे किंवा व्हिडीओज सोशल मिडीयात शेअर करुन धुमाकूळ घालणारी मॉडेल, अँकर आणि अभिनेत्री पूनम पांडेचा हॉट फोटो शूट तिनं तिच्या अधिकृत ट्‌वीटर हॅंडलवर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत.

पूनमने या पोस्टला “इमॅजिनरी क्‍लोथ्स’ असे नाव दिल्याने, त्याचा अर्थ आपण काल्पनिक कपडे परिधान केले आहेत, असे समजले जावे, असा होते. आता एखाद्याने असे “काल्पनिक कपडे’ परिधान केले असतील, तर ते पाहण्यासाठी सोशल मिडीयाच्या चव्हाट्यावर गर्दी तर उसळणारच ना?

एकेकाळी संपूर्ण शरीरावर राष्ट्रध्वज परिधान करुन वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या पूनमने एकदा असेही जाहीर केले होते की, जर भारताने क्रिकेट विश्‍वचषक जिंकला, तर ती न्यूड पोझेस जाहीररित्या देईल. काही जाहिराती आणि लघुपटांमधील भूमिका सोडल्या, तर पूनमचे फारसे मोठे फिल्मी करिअरही नाही. मात्र, सातत्याने न्यूड फोटोशूट/व्हिडीओज प्रसिद्ध करुन सनसनाटी माजवणे हा तिचा आवडता छंद आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.