एनआरसी मुळे देशात रक्ताचे पाट वाहतील: ममता बॅनर्जी 

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी आसाममधील ४० लाख नागरिकांचे नागरिकत्व नॅशनल रजिस्टार ऑफ सिटिझन्स द्वारे अवैध ठरवल्याबाबत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. “या निर्णयामुळे देशामध्ये नागरी युद्ध होऊन रक्ताचे पाट वाहतील” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
“भाजपा सरकार नॅशनल रजिस्टार ऑफ सिटिझन्स द्वारे देशाला दुभागु पहात आहे. भाजपा द्वारे घेण्यात आलेला हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असून आम्ही हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही,” असे देखील त्या म्हणाल्या.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज नॅशनल रजिस्टार ऑफ सिटिझन्स द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आकडेवारी कच्च्या स्वरूपाची (Draft) असून ७ ऑगस्टला सुधारित यादी जाहीर होणार आहे. सुधारित यादी जाहीर केल्यानंतरही नागरिकांचे नाव न आल्यास त्यांना ३० ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज करण्याची मुभा देण्यात येणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)