आता गायीच्या शेणापासून मिळणार 30 हजार रूपये; कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली – खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने खादी प्राकृतिक पेंट आज बाजारपेठेत सादर केले. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे केंद्रीय लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

हा उद्योग लवकरच 6 हजार कोटी रुपयांचा होईल. त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना मिळेल. खेड्यातून शहराकडे येणारा लोंढा कमी होईल. हे पेंट गायीच्या शेणापासून तयार करण्यात येत असल्यामुळे गाईंची सुरक्षितता वाढेल. खादी प्राकृतिक पेंट इतर पेंटपेक्षा कसल्याही पातळीवर कमी नाहीत.

यात विषारी घटक नाहीत. ते बॅक्‍टेरिया विरोधी आहेत. तसेच या पेंटचा वास येत नाही.इतर रंगांचा दर 550 रुपये प्रति लिटर असताना या रंगाचा दर मात्र केवळ 225 रुपये प्रति लिटर आहे. महामंडळाची वार्षिक उलाढाल सध्या 80 हजार कोटीची आहे. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महामंडळाची उलाढाल वर्षाला 5लाख कोटी रुपयांची करण्याचा संकल्प आहे, असे गडकरी म्हणाले.

ज्या गाईंचे दूध कमी झाले आहे अशा गाईंच्याही शेणाचा वापर होत असल्यामुळे सर्व गाईंची सुरक्षितता वाढेल. हा पेंट डिस्टेंपर आणि प्लास्टिक इमल्शन स्वरूपात उपलब्ध आहे. यात जस्त, पारा, क्रोमियम, कॅडमियम असे घटक नाहीत. साध्या हिशेबानुसार प्रत्येक गाईपासून यामुळे वर्षाला 30 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकणार आहे, असा दावा लघुउद्योग मंत्रालयाने केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.