डायमंड हार्बर – भारतीय जनता पक्षाचे आमदार सुवेंदु अधिकारी यांनी आदिवासी मंत्री विरबहा हंसदा यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केली आहेत. या अदिवासी मंत्र्यांच्या संबंधात इतकी असंवेदनशील भाषा वापरल्याबद्दल आता पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष नढ्ढा हे माफी मागणार आहेत काय, असा सवाल तृणमूल कॉंग्रेसचे नेते खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.
तृणमूल कॉंग्रेसचे अखिल गिरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरल्याने तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली होती. आता अशीच माफी नढ्ढा आणि मोदींनी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस गाडीसाठी ‘या’ 25 ट्रेनच्या वेळेत बदल
भारतीय जनता पक्ष हा अदिवासी विरोधी पक्ष आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले सुवेंदु अधिकारी यांनी विरबहा हंसदा या आदिवासी मंत्र्यांच्या संबंधात जी विधाने केली आहेत त्याचा व्हिडीओ तृणमूल कॉंग्रेसने जारी केला आहे.
Belittling women & the ST community comes as second nature to @SuvenduWB.
He has used the most unparliamentary language for MLA @Birbaha_Hansda, who is a daughter of the soil, a proud adivasi.
Any sermon on respect for women from @BJP4India leaders is a cruel joke. pic.twitter.com/TY8uhmtj3J
— All India Trinamool Congress (@AITCofficial) November 14, 2022
हा व्हिडिओ अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर टाकला आहे. देवनाथ हंसदा आणि विरबहा हंसदा (Birbaha Hansda) यांची जागा माझ्या बुटाखाली आहे, ती त्यांना किंमत देत नाही, अशा स्वरूपाची विधाने अधिकारी यांनी केली आहेत.