उन्हाळ्याच्या हंगामात किंवा एरवीही वातानुकूलित यंत्रणाशिवाय अनेकांना घरात राहणे शक्य होत नाही पण आता या एसी यंत्रणेशिवायही घर थंड राहणे शक्य होणार आहे कारण बोस्टनमधील काही वैज्ञानिकांनी असा एक अनोखा पेपर तयार केला आहे.
त्या पेपर च्या माध्यमातून घर थंड राहू शकते बोस्टनमधील नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी हा अनोखा कुलिंग पेपर निर्माण केला आहे हा पेपर तयार करणाऱ्या वैज्ञानिकांच्या टीमचे प्रमुख यी झेंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा पेपर जर घरावर किंवा इमारतीवर झाकण्यात आला तर घर किंवा इमारत थंड राहण्यासाठी मदत होऊ शकते.
या पेपरचा रंग अतिशय हलका साधा असून त्यावर पडणारे सूर्यकिरणे परावर्तित होतात शिवाय हा पेपर घरात असणारी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे कुकिंग उपकरणे यामधील उष्णताही खेचून घेण्याचे काम करतो या पेपरचा वापर करून तापमानात दहा अंश सेल्सिअसपर्यंत घट करणे शक्य होणार आहे.
हा पेपर संपूर्णपणे पर्यावरण पूरक असून त्याचे रिसायकलिंग करणेही शक्य आहे या पेपरवर हवामानाचा कोणताच परिणाम होत नाही तीव्र तापमान किंवा सोलर रेडिएशनचाही या कागदावर परिणाम होत नाही असा संशोधकांचा दावा आहे या पेपरचा रिसायकलिंग करून बनवण्यात आलेला नवा पेपरही पूर्वीच्याच पेपर एवढा कार्यक्षम असतो असेही या संशोधकांनी म्हटले आहे