आता लोकांचा उद्रेक होईल; फडणवीसांचा सरकारला इशारा

मुंबई – करोनाचा उद्रेक किती दिवस राहिल हे सांगता येत नाही, त्यामुळे व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. कठोर निर्बंध लावावेत मात्र, जनता व व्यापाऱ्यांच्या भावनाही लक्षात घ्या. मागील वर्ष लोकांसाठी अडचणीचे ठरले आहे. नागरिक अद्याप वीज बिल भरु शकले नाहीत. जनतेला आर्थिक पॅकेज दिले गेले पाहिजे. राज्यावरील कर्ज वाढत असेल तरी चालेल पण लोकांना आर्थिक पॅकेज द्या. जर पुन्हा लॉकडाउन झाला तर लोकांचा उद्रेक होईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल तात्काळ दिले गेले पाहिजेत. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. राज्यात ऑक्‍सिजनची कमी आहे. रेमडेसिवीर लवकरात लवकर उपलब्ध केले पाहीजे. या सर्व बाबीत सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.