डॉ. नितीन बिलोलीकर आता वैद्यकीय आरोग्य अधिकारी
पुणे : शहरात करोनाचा उद्रेक रोखण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याने राज्यशासनाने पालिकेसाठी स्वतंत्र वैद्यकीय आरोग्य अधिकारी नियुक्त केला आहे. त्यासाठी डॉ. नितीन बिलोलीकर यांची महापालिकेत तातडीनं नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. बिलोलीकर हे जिल्हा शल्य चिकित्सक सर्वांगातील अधीकारी असून ते पदस्थपणे विना होते. त्याची सेवा महापालिकेसाठी वर्ग करण्यात आल्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढले आहेत.
दरम्यान, पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे प्रकृती ठीक नसल्याने 10 दिवसाच्या रजेवर असल्याने शहराची आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे या जागी तातडीनं अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे शासनाने पालिकेसाठी डॉ. बिलोलीकर यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात येत आहे.