आता मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते

मुस्लिम नेते साजीद रशीदी यांची दर्पोक्‍ती

नवी दिल्ली : देशातील ऐतिहासिक अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अयोध्येतील राम मंदिर हे अंदाजे तीन वर्षांत बांधून पूर्ण होईल असे मंदिराचे संरचनाकार सांगत आहेत. पण त्याचदरम्यान, ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.

मशीद ही कायम मशीदच असते असं इस्लाम सांगतं. मशीद पाडून त्या जागी काहीही दुसरं बांधता येत नाही. आम्हाला खात्री आहे की तिथे मशीद होती आणि कायम राहिल. मंदिर पाडून त्याजागी मशीद बांधण्यात आली नव्हती. पण आता कदाचित मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडलं जाऊ शकतं, अशी दर्पोक्ती ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजीद रशीदी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला हजेरी लावून संविधानाचा अपमान केला असल्याचेही मत मौलानांनी मांडले.

राम मंदिर भूमिपूजनानंतर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. भूमिपूजनात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पदाचा अपमान केला असल्याची टीका त्यांनी केली होती. जिथे एकेकाळी मशीद उभी होती, तिथे मंदिराचं भूमिपूजन करणं हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव असून हिंदुत्त्वाचा विजय असल्याचे ओवेसी यांनी म्हटले होते.

2 Comments
  1. Wani Balkrushna says

    माझे भारतीय मुसलमान बंधूना एकच सांगने आहे की भारतातील सर्व मुस्लिम धर्म हा मुळात मुस्लिम नसुन हिंदूच आहे तुमच्या पूर्वजांना मुघलांनी जबरदस्तीने मुसलमान बनविले आहे तुमची वंशावळ हिंदूच आहे

    1. Gajanan Namdev Wasudev says

      you are right. I am totally agree with you. But they don’t accept it.

Leave A Reply

Your email address will not be published.