राफेल व्यवहारावर आता शिवसेनेचाही आक्षेप

मुंबई : राफेल विमान खरेदीचा करार हवाईदलाच्या मजबुतीसाठी होता की आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या एका उद्योगपतीच्या मदतीसाठी होता असा सवाल शिवसेनेनेही केला आहे. राफेल प्रकरणात मोदी सरकारला अडचणीत आणणारी बातमी एका इंग्रजी राष्ट्रीय दैनिकात प्रकाशित झाली आहे त्या अनुषंगाने आपल्या पक्षाच्या मुखपत्रात शिवसेनेने हा सवाल उपस्थित केला आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की मोदींनी गुरूवारी संसदेत देशभक्तीवर भाषण दिले आणि राफेल कराराचे समर्थन केले. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रातून मोदी सरकारच्या काळ्या कृत्याचे हे पान प्रसिद्ध झाले. संसदेतील बाके वाजवून देशभक्तीच्या घोषणा देणाऱ्यांची तोंडे या वृत्ताने बंद झाली आहेत.

या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर राफेल करार हवाईदलाच्या मजबूतीसाठी झाला की उद्योगपतीच्या मदतीसाठी झाला ही बाब स्पष्ट झालीच पाहिजे असेही यात नमूद करण्यात आले आहे.विरोधक नेस्तानबूत होतील पण सत्य जिवंतच राहील असे शिवसेनेने म्हटले आहे.

लष्कराच्या मजबूतीकरणासाठी कॉंग्रेसने काही काम केले नाही त्यांची तशी इच्छाच नव्हती असा दावा मोदींनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जी बातमी प्रसिद्ध होते त्यात मोदींना राफेल व्यवहारात कसा व्यक्तीगत रस होता ही बाब स्पष्ट होते यातून काय बोध घ्यायचा असा सवालही शिवसेनेने केला आहे.

संरक्षण मंत्री आणि संरक्षण सचिवांसह सर्वांना दूर ठेऊन मोदी स्वत:च राफेल व्यवहाराची बोलणी करीत होते आणि विमानाची किंमत किती असावी आणि त्याचे कंत्राट कोणाला द्यावे या सर्व बाबी त्यांनी व्यक्तीगत रस घेऊन स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे त्यांना या विषयावरील आरोपांना आणि टीकेला उत्तर द्यावेच लागेल.

राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावरून सरकारकडे खुलासा मागणे ही देशाची बदनामी कशी ठरते असा सवालही शिवसेनेने केला आहे. भाजप सरकारच्या या राजवटीत राष्ट्रवाद आणि देशभक्तीची व्याख्याच बदलली आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)