साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रदर्शीत झालेल्या आणि हिट झालेल्या चित्रपटांचा बॉलीवूडमध्ये रिमेक बनवण्याची जनू स्पर्धाच लागली आहे. नुकताच अर्जुन रेड्डीचा बनवलेला रिमेक कबीर सिंग सुपर हिट ठरल्यानंतर आता अर्जुन रेड्डी फेम नायक विजय देवरकोंडाच्याच डिअर कॉम्ब्रेडचा रिमेक येणार असून या चित्रपटाचे सर्व हक्क दिग्दर्शक करण जोहरने विकत घेतले असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, “डिअर कॉम्रेड’च्या रिमेकसाठी करण ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरला साईन केले जाणार आहे. ईशान आणि जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. तर आता पुन्हा एकदा दोघेजण एकत्र ऑनस्क्रीन दिसणार आहेत. “धडक’ या चित्रपटातील ईशान आणि जान्हवीची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती. काही दिवसांपूर्वी, करण जोहर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाना भेटला होता.
करणने विजय देवराकोंडासोबतचा एका मीटिंगमधील फोटो सोशल मीडियावरून शेअर केला होता. करणने म्हणाला, मी डिअर कॉम्ब्रेडचा सिक्वल बनवण्यासाठी अत्यंत उत्साहित आहे. सध्या करण “तख्त’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.