आता दोन दिवसात मोबाईल नंबर होणार पोर्ट

ट्रायकडून नवीन नियमांची अंमलबजावणी लवकरच

नवी दिल्ली : मोबाईल नंबरच्या पोर्टेबिलिटीसाठी सरकारकडून ग्राहकांना दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. कारण आजपर्यंत मोबाईल नंबरच्या पोर्टेबिलीटीसाठी सात दिवसांचा कालावधी लागत होता. परंतू, आता यात आणखी सुटसुटीतपणा आणण्यासाठी सरकारने याचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मोबाईल नंबरच्या पोर्टेबिलीसाठी दोनच दिवसांचा वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) मोबाइल ग्राहक पोर्टेबिलिटी (एमएनपी) साठी ग्राहकांना 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यान अर्ज करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. कारण ट्रायच्या म्हणण्यानुसार एमएनपी सुधारित नियम लागू करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार मोबाईल नंबरच्या पोर्टेबिलीसाठी वेळ कमी लागणार आहे. आता 11 नोव्हेंबरपासून ग्राहक मोबाईल नंबर पोर्टसाठी अर्ज करू शकतील.

ग्राहक एमएनपी अंतर्गत नंबर न बदलता त्यांचे नेटवर्क बदलू शकतात. ट्रायच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण केली जाणार आहे. सरकारकडून देण्यात येणारी ही सुविधा 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून अंमलात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.