आता जमीन आणि पान्यावरही उतरणार विमान

नवी दिल्ली – चीनने नुकतेच एक उभयचर विम्नान विकसीत केले असून हे विमान धावपट्टी आणि पान्यावरही उतरू शकेल. नुसतेच उतरणार नाही तर हे विमान या दोन्ही ठिकाणांवरुन उड्डानही करु शकेल. या विमानाचे कोड नेम “एजी 600 कुनलोंग’ असे आहे. त्याच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. अशा पद्धतीचे हे जगातील सर्वात मोठे विमान आहे. ते पूर्णपणे चीनमध्येच बनवण्यात आले आहे.

“एव्हीएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना’ने हे विमान विकसित केले असून या विमानाचे इंजिनही पूर्णपणे “मेड इन चायना’ आहे. या विमानाची ताशी 145 किलोमीटर या वेगाने वॉटर टेक्‍सिंग ट्रायल झाली होती. हे विमान सलग बारा तास उड्डाण करू शकते. सागरी बचाव मोहिमेत तसेच जंगलातील वणवा शमवणे, सागरी सीमांवरील टेहळणी आदींसाठी हे विमान महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.