अंकारा,- तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुत कावूसोग्लू यांनी संयुक्त राष्ट्राला एक पत्र पाठवून यापुढे आपल्या देशाला केवळ “तुर्की’ असे न संबोधता “तुर्कीये’ असे संबोधण्याची विनंती केली आहे. तुर्कीकडून आपल्या देशाची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला आहे.
देशाचे “तुर्की’ हे नाव एका पक्ष्याच्या नावावरून धारण करण्यात आले होते. मात्र आता तुर्कीच्या सरकारला हे नाव सोडून द्यायचे आहे. कारण या अर्थामध्ये काही नकारात्मक अर्थ दडलेला आहे, असे समजले जाऊ लागले आहे. तुर्कीने कागदोपत्री आपल्या देशाचे नाव बदलण्याची विनंती केली असल्याच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटरेज यांच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे.
तुर्कीचे अध्यक्ष रेसिप तयिप इर्डोगन हे दीर्घ काळापासून देशाचे नाव “तुर्की’ बदलून “तुर्कीये’ करण्यासाठी प्रयत्नशील होते. तुर्कीला 1923 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. तेंव्हाच देशाने “तुर्कीये’ नाव धारण केले होते.
“तुर्कीये’ या नावातून तुर्की भा,ेतील प्रतिनिधित्व योग्य प्रकारे केले जात असल्याचे इर्डोगन डिसेंबर महिन्यात म्हणाले होते. त्यानंतर तुर्कीच्या मंत्र्यांनी अधिकृत कागद पत्रांवर “तुर्की’ ऐवजी “तुर्कीये’ असीाच उल्लेख करायला सुरुवात केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने “तुर्की’च्या ऐवजी “तुर्कीये’च्या वापराचा एक प्रमोशनल व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यानुसार इंग्रजीमध्येही नावाचे स्पेलिंग बदलण्यात आले आहे.