आता मायग्रेशन, टीसी मिळणार उपकेंद्रातच

नगर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्रामध्येच मायग्रेशन सर्टिफिकेट, टीसी विद्यार्थ्यांना देण्याची सुविधा शनिवार (दि 14 सप्टेंबर) पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती उपकेंद्राचे संचालक डॉ. सोमवंशी यांनी दिली.

याआधी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट हवे असल्यास त्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. त्यानंतर विद्यार्थी ऑनलाइन अर्जाची प्रत ही नगरच्या उपकेंद्रामध्ये दिली जात होती. येथून ही प्रत विद्यापीठाकडे पाठवली जात होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना मिायग्रेशन सर्टिफिकेट दिले जात होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)