आता रेल्वेला कपांवरून निवडणूक आयोगाची नोटीस 

नवी दिल्ली – आचारसंहिता भंगाच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने रेल्वेला आणखी एक कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एका रेल्वेगाडीत मैं भी चौकीदार अशी घोषणा लिहिलेल्या पेपर कपांमधून चहाचे वाटप होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून आयोगाने नोटीस बजावली.

संबंधित घडामोडीबाबत स्पष्टीकरण देताना रेल्वेने ते कप काढून घेण्यात आल्याचे आणि कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आल्याचे नमूद केले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे असणाऱ्या तिकिटांच्या वाटपावरून रेल्वे विभाग अडचणीत आला होता. ती चूक अनावधानाने झाल्याचे त्यासंदर्भात रेल्वेने म्हटले होते. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे. त्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारींची दखल निवडणूक आयोगाकडून तातडीने घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.