आता ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचा काळाबाजार?; बाजारातून इंजेक्शन झाले गायब

नवी दिल्ली :  देशात एकीकडे कोरोनाने हैराण केले आहे तर  दुसरीकडे ब्लॅक फंगसच्या रुपाने नवे  संकट उभे  राहिले  आहे. सध्या बाजारात ब्लॅक फंगसवर मिळणारे इंजेक्शन  Liposomal amphotericine B बाजारात उपलब्ध होत नसून त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ज्या प्रकारे देशात रेमडेसिवीरचा काळा बाजार करण्यात आला त्या पद्धतीनेच आता ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले  की या आधी यावरच्या इंजेक्शनची मागणी जास्त नव्हती. त्यामुळे त्याचे उत्पादनही अत्यंत कमी प्रमाणात केले जायचे. आता अचानक एवढी मागणी वाढली आहे की त्या प्रमाणात सध्या पुरवठा होत नाही. त्यामुळे याचा साठेबाजार होत असून ते बाजारातून गायब झाले आहे.

या इंजेक्शनसाठी लागणारा कच्च्या मालाची कमतरता असल्यानेही याचे उत्पादन कमी असल्याचं सांगण्यात येतंय. ब्लॅक फंगसवर मिळणारे इंजेक्शन, Liposomal amphotericine B ची किंमत जवळपास पाच ते आठ हजारांच्या घरात आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर लोकांमध्ये ब्लॅक फंगसचा आजार वाढत असल्याचे समोर आले  आहे. खासकरून, ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे त्यांना या आजाराची लागण होत असल्याचे  सांगण्यात येत  आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.