बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतं वजन ही प्रत्येकाची समस्या झाली आहे. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्याचा अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात.
अनेक वेळा डाएट करुनही वाढलेल्या वजनाला आळा बसत नाही. अशा वेळी आहारामध्ये वजन कमी करण्यास मदत करणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा तसेच अनियमित खाणं, जंक फूडचा आहारात सर्वाधिक वापर आणि ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम केल्यामुळे अनेकांचं वजन झपाट्याने वाढत आहे.
वाढतं वजन कमी करण्यासाठी लोक जीम, योग, डाएट अशा गोष्टींचा आधार घेतात. कितीही उपाय केले तर मनाप्रमाणे वजन कमी होत नाही. अशात जर तुम्हाला कमी वेळेत वजन कमी करायचं असेल तर आम्ही तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहोत.
अनियमित खाणं, जंक फूड
अनियमित खाणं, जंक फूडचा आहारात सर्वाधिक वापर आणि ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम केल्यामुळे अनेकांचं वजन झपाट्याने वाढत आहे.
कॉफी + खोबरेल तेल
व्यायाम आणि योगासनं करूनही वजन जर कमी होत नसेल तर कॉफीने कसं काय होणार? ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे त्यांनी कॉफीत जेवणात वापरणारं खोबरेल तेल घाला. असं केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि पर्यायाने वजनही कमी होतं.