मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सईने अनेक हिट मराठी चित्रपटांमधून चाहत्यांच्या मनावर राज केले आहे.
View this post on Instagram
तिचा नुकताच “मीमी’ हा बॉलीवूडमधील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे सईला देशभरात प्रसिद्धी मिळाली. तसेच सईच्या दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली आणि तिच्या कामाचेही विशेष कौतुक करण्यात येत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सईच्या कामाचे कौतुक करताना सहकलाकार आणि चाहते थकत नाही. पण सईचा प्रवास केवळ बॉलीवूड पुरता मर्यादित न राहता आता साऊथपर्यंत जाऊन पोहोचला आहे. सई आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नवरसा वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
नेटफ्लिक्सवर ही तमिळ वेबसिरीज दिसणार आहे. दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपती सोबत ती झळकणार आहे. सईने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिने विजयसोबत फोटो पोस्ट केला आहे. तर त्यावरील कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तमिळ भाषेत तिने हे कॅप्शन लिहिले आहे.
View this post on Instagram