-->

आता रडावर रॉबर्ट वॉड्रा; अटकेसाठी ‘ईडी’ची कोर्टात धाव

नवी दिल्ली –  काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वॉड्रा यांच्या अडचणीत वाढ होणार अस चित्र आहे. बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने आपला मोर्चा रॉबर्ट वॉड्रा यांच्याकडे वळवला आहे.

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात राजस्थान हायकोर्टात अटकेची याचिका दाखल केली आहे. ‘ईडी’कडून रॉबर्ट वाड्रा आणि महेश नागर यांना अटक करुन त्यांच्या चौकशीची परवानगी हायकोर्टाकडे मागण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रॉबर्ट वाड्रा यांची एएसजी राजदीपक रस्तोगी, तर ईडीकडून भानुप्रताप बोहरा बाजू मांडणार आहेत.

२००७ साली वाड्रा यांनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या मातोश्री मौरीन या कंपनीच्या संचालक पदावर आहेत. त्यानंतर कंपनीचं नाव बदलून स्कायलाइट हॉस्पीटॅलिटी लिमिटेड लायबिलीटी करण्यात आलं. कंपनीच्या नोंदणीवेळी ही कंपनी रेस्टॉरंट, बार आणि कॅंटीन चालविण्याच्या क्षेत्रात काम करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

 

दरम्यान वाड्रा यांच्या कंपनीने २०१२ साली जोधपूरच्या कोलायत येथे दलालांच्या माध्यमातून २७० बिघा जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. ही जमीन बिकानेर येथील भारतीय सेनेच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजसाठी देण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.