मुंबई – झी मराठी चॅनेलवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी म्हणजेच राणादा (हार्दिक जोशी) सध्या चांगलाच लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या राणाने वेड लावलं आहे. मात्र, हाच पहिलवान गडी आता एका नवीन रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
कुस्ती खेळणारा राणादा आता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. राणादाचा हा नवीन लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे राणादाची ही वेगळी भूमिका आणि रुप पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्साही असल्याचे दिसत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरु झाली असून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी चॅनेलवर प्रदर्शित होते