आता प्रियांका गांधी यांनी मोदींना दिले प्रतिआव्हान

बेरोजगारी, बलात्कार, भ्रष्टाचार या मुद्‌द्‌यांवर बोला
रांची: नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून कॉंग्रेसला आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्रतिआव्हान दिले. मोदींनी बेरोजगारी, बलात्कार, भ्रष्टाचार या मुद्‌द्‌यांवर बोलावे, असे त्या म्हणाल्या.

झारखंड विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी मंगळवारी मोदींची सभा झाली. त्यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून कॉंग्रेसला लक्ष्य केले. त्या कायद्यावरून कॉंग्रेस खोटे बोलत आहे. सर्व पाकिस्तानींना भारतीय नागरिकत्व देण्याची तयारी असल्याचे कॉंग्रेसने जाहीर करावे, असे आव्हान मोदींनी दिले. त्यानंतर प्रियांका यांची कॉंग्रेसच्या प्रचारासाठी झारखंडच्या पाकूरमध्ये सभा झाली.

त्यावेळी बोलताना त्यांनी मोदींच्या आव्हानाचा संदर्भ दिला. तुम्ही (मोदी) कुणाचे पंतप्रधान आहात? तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की विभाजनाचे? या प्रश्‍नांवर तुमच्याकडे उत्तर नाही, असा पलटवार प्रियांका यांनी केला. भाजप प्रचारात सुपर हिरो आहे. मात्र, कामात झिरो आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था मंदावल्याचा आरोप त्यांनी पुढे बोलताना केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.