अभिनेते ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी निधन झाले त्यावेळी ते शर्माजी नमकीन या सिनेमात काम करत होते. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे या सिनेमाचे शूटिंग अर्धवट राहिले होते.
मात्र, आता हा सिनेमा पूर्ण केला जाणार आहे. ऋषी कपूर यांच्या जागेवर परेश रावल त्यांची भूमिका पूर्ण करणार आहे. ऋषी कपूर यांचा वाढदिवस चार सप्टेंबर रोजी असतो. त्याच दिवशी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.
ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आता हा सिनेमा पूर्ण केला जाणार आहे. व्हीएफएक्सच्या मदतीने सिनेमात सुधारणा केली जाणार आहे. या सिनेमाचे केवळ चार दिवसांचे शूटिंग बाकी राहिले आहे.
बाकीचे शूटिंग जानेवारी 2020 मध्ये केले गेले होते. ऋषी कपूर आजारपणामुळे बराच काळ परदेशात होते तेव्हापासून या सिनेमाचे शूटिंग रखडले होते.
आजारी पडण्याच्या अगोदर “बॉडी’ या सस्पेन्स थ्रिलर सिनेमांमध्ये ऋषी कपूर यांनी काम केले होते. त्यापूर्वीही “कपूर ऍन्ड फॅमिली’मधील त्यांची आजोबांची भूमिका विशेष गाजली होती.