…आता तर ‘पप्पूची पप्पी’ही आली – केंद्रीय मंत्री 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक २०१९ ची घोषणा झाल्यानंतर राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य सुरु झाली आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या सिकंदराबादमध्ये रॅलीला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पप्पू म्हणतो की पंतप्रधान बनणार, आता तर पप्पूची पप्पी (प्रियांका गांधी) देखील आली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे.

महेश शर्मा यांनी म्हंटले कि, पप्पू म्हणतो की पंतप्रधान बनणार, मायावती, अखिलेश पप्पू आणि आता तर पप्पूची पप्पी (प्रियांका गांधी) देखील आली आहे. त्या याआधी देशाच्या कन्या नव्हती का, काँग्रेसच्या कन्या नव्हती का, सोनिया यांच्या कुटुंबातील कन्या नव्हत्या का, आता नाही आहे का, पुढे राहणार नाही का, काय नवीन घेऊन आल्या आहेत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, आधी नेहरू, मग राजीव गांधी, नंतर संजय गांधी आणि आता राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यापेक्षा अधिक काही पाहायचे असेल तर आमचे पंतप्रधान वाघ नरेंद्र मोदी यांना पाहा, असेही ते म्हणाले.

https://twitter.com/ANINewsUP/status/1107503713097273344

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)