अभिषेक बच्चन वेब सीरीज “ब्रीथ ः इनटू द शेडोज’मधून डिजिटल प्लॅटफार्मवर लवकर डेब्य्र करणार आहे. अभिषेक बच्चनच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक पोस्ट रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चन अत्यंत इंटेंस लूकमध्ये दिसत आहे.
या वेब सिरीजमध्ये अमित साध पुन्हा एकदा सीनियर इंस्पेक्टर कबीर सावंतच्या भूमिकेत दिसणार आहेत. 10 जुलैला रिलीज होणा-या या सीरीजमध्ये नित्या मेनन आणि सयामी खेरदेखील झळकणार आहेत.
याबाबत अभिषेक बच्चन म्हणतो, ऍमेझॉन ओरिजिनल “ब्रीथः इनटू द शेडोज’सह माझे डिजिटल ऑन-स्क्रीन पदार्पण करण्याची घोषणा गेल्या शुक्रवारी करण्यात आली होती. या शोच्या लॉंचिंग तारखेची घोषणा केल्यानंतर मला जे प्रेम आणि समर्थन मिळाले, यातून माझा नवीन प्रेक्षकांशी जोडण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. मी माझी पहिली डिजिटल सीरीज लॉच करण्यासाठी उत्साहित आहे.
या सीरीजमध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार रोमांच अनुभवता येईल. मी निश्चितपणे येणा-या दिवसांची प्रतिक्षा करत आहे. कारण आम्ही हळु-हळु जगासमोर “ब्रीथः इनटू द शेडोज’ घेवून येत आहे. या शोचा ट्रेलर 1 जुलै रोजी लॉंच होणार आहे, असे अभिषेक सांगतो. दरम्यान, या वेब सीरीजबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे.