साध्वी प्रज्ञा सिंग यांना आता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून नोटीस

भोपाळ – भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी परवा मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीर मरण प्राप्त झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत अशोभनीय वक्तव्य केलं होतं.

यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा एका दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना त्यांच्या आणखीन एका वक्तव्यासाठी भोपाळच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी “मी आयोध्येतील ती इमारत पाडण्यात सहभागी होते आणि तेथे राम मंदिर उभारण्यासाठी देखील उपस्थित राहील” असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता भोपाळच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना या वक्तव्याबाबत एका दिवसाच्या आत खुलासा करावा असे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.