नवी दिल्ली : आजच्या काळात, व्हॉट्सऍप असे एक इन्स्टंट मेसेजिंग ऍप बनले आहे, ज्याशिवाय कोणीही राहू शकणार नाहीत. वैयक्तिक ते व्यवसायाशी संबंधित विविध कामे आता बहुतांशवेळा व्हॉट्सऍपद्वारे केले जात आहे. जरी व्हॉट्सऍपचा वापर बहुतेक लोक एकमेकांना संदेश आणि चित्रे-व्हिडिओ इत्यादी पाठवण्यासाठी करत असले तरी काही लोक व्हॉट्सऍपवर व्यावसायिक हेतूने खरेदी -विक्रीचे कामदेखील करत असतात.
बरेच लोक ग्रुप वगैरे तयार करतात, ज्यात बरेच मित्र एकत्र येतात. जेव्हा कोणी त्या ग्रुपमध्ये मेसेज पाठवतो, तेव्हा ग्रुपचे इतर सदस्यही ते आरामात वाचू शकतात. परंतु बऱ्याच वेळा असे देखील घडते की तुम्ही नको असलेल्या गटांमध्ये सामील होता किंवा असे म्हणा की काही लोक तुमच्या संमतीशिवाय तुम्हाला काही ग्रुपमध्ये सामील करतात. त्यामुळे प्रश्न उद्भवतो की अशी काही सेटिंग आहे का, ज्याद्वारे आपण असे काही करू शकतो जे आपल्या संमतीशिवाय एखाद्या ग्रुपमध्ये आपल्याला जोडणार नाही? तर या प्रश्नाचे उत्तर होय आहे. चला तर, जाणून घेऊया त्याबद्दल.
– सर्वप्रथम, तुम्हाला तुमचे व्हॉट्सऍप ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल ऍप स्टोअरवरून अपडेट करावे लागेल. त्यानंतर व्हॉट्सऍप उघडा आणि सेटिंग्जवर जा. त्यानंतर सेटिंग्जमधील प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.
– प्रायव्हेसी ऑप्शननंतर तुम्हाला ग्रुप ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्यासमोर तीन पर्याय उघडतील. प्रत्येकजण (एव्हरीवन), माझे संपर्क (माय कॉन्टॅक्ट) आणि कोणीही नाही (नो बडी). आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
– जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला संमतीशिवाय कोणीही ग्रुपमध्ये जोडले नाही पाहिजे तर यासाठी तुम्हाला तिसरा पर्याय ‘नो बडी’ अर्थात ‘कोणीही नाही’ हा पर्याय निवडावा लागेल. याचा फायदा असा होईल की जर कोणत्याही व्हॉट्सऍप ग्रुपचा ऍडमिन तुम्हाला त्याच्या ग्रुपमध्ये ऍड करू इच्छित असेल तर तो तुम्हाला आधी आमंत्रण पाठवेल. जर तुम्ही ‘ओके’ केले, तरच तो तुम्हाला गटात जोडू शकेल, अन्यथा तो तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही.