आता नासा घेणार विक्रम लॅंडरचा शोध

नवी दिल्ली : भारताची महत्वकांक्षा योजना चांद्रयान-2 ला भारतीय वैज्ञानिकांना शेवटच्या क्षणाला यशाने हुलकावणी दिली. दरम्यान, आता चांद्रयान-2 मधील ऑर्बिटरने विक्रमच्या लॅंडिंगच्या जागेचा फोटो पाठवलेला असला तरी इस्रोच्या वैज्ञानिकांना त्यावरुन अद्याप ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही. आता अमेरिकेची प्रसिद्ध अवकाश संस्था नासा इस्रोच्या मदतीला धावणार आहे. नासा आता विक्रमला शोधून त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मागच्या आठवड्यात लॅंडिंगच्या अखेरच्या टप्याप्यात विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. इस्रोकडून संपर्क साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. नासाच्या जेपीएल प्रयोगशाळेच्या 70 मीटर अँटेनाच्या सहाय्याने सुद्धा विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती भ्रमण करत आहे. नासा या ऑर्बिटरच्या सहाय्याने विक्रमच्या लॅंडिंगच्या जागेचे फोटो काढणार आहे. सध्या चंद्राच्या ज्या भागावर विक्रम आहे तिथून 17 सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर जाणार आहे. त्यावेळी ऑर्बिटरमधून काढण्यात येणारे फोटो इस्रोकडे सोपवण्यात येतील. त्यावेळी विक्रमची नेमकी स्थिती काय आहे ते समजू शकेल.

विक्रम बरोबर संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे फक्त 21 सप्टेंबरपर्यंतचा वेळ कारण त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. रात्रीच्यावेळी चंद्रावर कडाक्‍याचा थंडावा असतो. त्या वातावरणात लॅंडर, रोव्हर काम करण्याची शक्‍यता नाही. पृथ्वीचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. त्यामुळे लॅंडर, रोव्हरची रचना दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. ऑर्बिटरशिवाय नासा त्यांच्या डीप स्पेस नेटवर्क सेंटरच्या मदतीने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)